ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी – मोफत क्लासेससाठी सराव परीक्षेत सहभागी व्हा
ग्रामीण भागाती
ल गरीब व गुणवत्ताशील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी यासाठी गायकवाड क्लासेस, सांगोला यांच्यातर्फे एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सराव परीक्षा घेतली जाणार असून, त्यातून निवडक ५ विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत स्कॉलरशिप क्लासेस दिले जाणार आहेत.
ही परीक्षा शनिवार-रविवार चालणाऱ्या विशेष वीकेंड बॅचसाठी असेल. यामध्ये अभ्यासक्रमानुसार विषयांचे सखोल मार्गदर्शन, आठवड्याला चाचण्या व अनुभवी शिक्षकांची साथ दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे अनेक उपक्रमही यात असतील. शहराच्या तुलनेत संधींपासून वंचित राहणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
इयत्ता तिसरी व चौथी घटक-क्रियापद चाचणी क्रमांक -४
परीक्षेचा तपशील व गुण वाटप खालीलप्रमाणे आहे:
| इयत्ता | एकूण गुण | मराठी | गणित | इंग्रजी | बुद्धिमत्ता |
|---|---|---|---|---|---|
| दुसरी | 100 | 10 | 15 | 10 | 15 |
| तिसरी | 100 | 10 | 15 | 10 | 15 |
| चौथी | 150 | 20 | 20 | 15 | 20 |
नोंदणीसाठी गायकवाड क्लासेस, सांगोला येथे त्वरित संपर्क साधावा.
अथवा पुढील लिंक ओपन करून आपली माहिती भरावी.
आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा.
आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा.

0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.